सांजवात
सांजवात
दिवा पाहूनी लक्ष्मीचे
आगमन गृहामधे
ज्योत दिव्याची तेवते
शांत देवघरामधे
सांजवेळी गृहलक्ष्मी
वाट बघते आतुरे
कल्याणाची दीर्घायुची
देवा आळवणी करे
मंद ज्योत पाहताना
मनस्वास्थ्य मिळतसे
शीण दिवसभराचा
दूर त्वरे पळतसे
ठेव परंपरागत
तिलासुदैवाने लाभे
मनोमनी विनवणी
देवा आशिर्वच मागे
सौ. मनीषा आवेकर
