प्रेमवेडी
प्रेमवेडी
कशा सांगू सख्या
तुला
मम मनीच्या भावना
शब्द येती अंतरात
अडसर अधरांना
प्रेमभावनेचे गुज
कधी कसे सांगू तुला
तुझा माझा एकपणा
शब्दांमधी ना मावला
प्रेमवेडी झाल्यावरी
दंग प्रेमरंजनात
प्रीत आपुली अबोली
कधी होई पूर्ततेत
भाव मम मनातील
दाटतात लोचनात
जाण सख्या झडकरी
शब्दावीण अंतरात
जावे विरुनी अंतर
जावा विरुनी दुरावा
प्रेमरस अंतरीचा
घडी मीलनी खुलावा
आले घन नभांगणी
यावे प्रिया झडकरी
अद्वैतात रममाण
मग्न युगुल अंबरी
...................................
सौ. मनीषा आवेकर
पुणे
फोन 9763706200
...............................
