जीवनाचे पुस्तक
जीवनाचे पुस्तक
जीवनाचे पुस्तक कोरे , जन्मतःच हाती येते.
रेखितो त्यावरी अक्षरे , मानव आपुल्या हाते (1)
बालपणीचा काळ सुखाचा ,
धमाल सखयांसवे
पेरु आवळे चिंचा बोरे
चिमणचोचीने खावे (2)
यौवनातले बहर हिरवे , मोरपिशी जीवनी
प्रेमाचे कवाड खुलते , इंद्रधनू रेखूनी (3)
कर्तृत्वाच्या रेखा खुलविती
यशोमय कीर्तीला
स्थान जगी उंचावती अथक यत्नमाला (4)
आयुष्यातील सुखदुःखांची , नोंद असे मानसी
कठीण प्रसंगी हात देती
त्यासी तू जाणसी (5)
संध्याछाया खुणाविती , ईश्वर चिंतन मनी
पैलतीर दिसे नयनी , सार्थकता जीवनी (6)
कुणा न माहित कधी , पान शेवटले येतसे
जगन्नियंत्या हाती दोरी
विधाताच जाणतसे (7)
..........................
सौ. मनीषा आवेकर
फोन 9763706200
...................................
