स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य वेदीचे कुंड पेटले
आहुतीस्तव प्राण अर्पिले
भारतमाता बद्ध शृंखले
लाल बाल पाल गरजले
परक्यांच्या दास्यातूनी
मुक्त व्हावी भारतमाता
ध्यास एकचि उरी धरुनी
योजनेस कार्यान्वितता
पेटत्या रणी उडी टाकूनी
योजना आखली धाडसानी
क्रूर अधिका-यांना मारुनी
जशास तसे उत्तर देऊनी
उच्च शिक्षण परदेशी घेऊनी
विनायक श्रेष्ठ विद्वानांमधी
छुप्या योजना आखूनी
उडी ठोकली सागरामधी
जीवाची पर्वा नच करुनी
संसारासी दिले झुगारुनी
सर्वस्वास दिले झोकूनी
उत्तर दिधले कृतीमधूनी
हादरले इंग्रज प्रतिकाराने
गाशा गुंडाळुनी पळाले
स्वातंत्र्याचे वरदान लाभले
अनमोल स्वप्न साकारले
महत्तम स्वातंत्र्याला
जपूया प्राणपणाने
नको थारा स्वैराचारा
राहू सारे एकदिलाने
स्वातंत्र्यदिनी करुया
स्मरण वीर योद्धयांचे
घेऊ प्रेरणा कार्यासी
रक्षण करुया देशाचे
...........................................
सौ. मनीषा आवेकर
पुणे
फोन 9763706200
.........................................
