STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

मनवेडे

मनवेडे

1 min
176

तुझ्या सारख मन ही आज भरून आलंय.

नुसती आठवणीची गर्दी झाली आहे.

तुझं बर असते रे पावसा,

भरून आलास की कोसळतो.

आमच्या सारख्या संवेदनशील लोकांनी,

सांग बरे कस रीत व्हायचं?

तुला ना दुनियेची फिकर,

ना कोणाची चिंता.

आमचं मात्र नेहमीचच,

दुःखाला कवटाळून बसणं.

आला आहेस तर सोबत,

त्याची याद जरा घेऊन ये.

तुला दिसणार नाहीत रे आसवं.

चूक तुझी नाहीच रे.

तुला आमच्या कवितेत सजवतो.

किती तुझं ते कौतुक करतो.

किती ही तू भिजवला तरी,

आतून का कोरडी राहते?

जाता जाता का सांग ,

पुन्हा मन भरून जाते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract