चित्र तुझे
चित्र तुझे
चित्र तुझेच रेखाटतो आहे,
मनाच्या कोऱ्या कागदावर.
रंग होऊन ये तू प्रितीचे,
उमटवून जा तुझ्या पाऊलखुणा घरभर.
श्वासात माळून ये गंध अनोखा,
दरवळत रहा माझ्या तनमना वर.
गुलाबी, लाल रंगात पाऊल रंगवून गेली तू.
जाता जाता रंग आठवणीचे मागे ठेवून गेली तू.
फिक्के झालेत आता रंग आणि तुझ्या त्या पाऊलखुणा.
पुन्हा पुन्हा चित्र तुझच रेखाटतो पण,
हात थबकतो आता ,तुझ्या चित्रात रंग भरताना.
परत नाही पहायचे मला , फिके रंग तुझे होताना.