STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

हे पावसा

हे पावसा

1 min
116

उगाच टपोरे थेंब तुझे,अंगभर लेवू देवू नकोस..

हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस.

चिंब भिजवून टाक या साऱ्या आसमंताला.

माझ्या मनात मात्र तू गर्दी करू नकोस.

हे पावसा उगा आठवन पुन्हा ती देवू नकोस.

तू किती ही भिजवलेस मला,तरी कोरडीच मी राहणार आहे.

तुला काय कळणार काय असत भिजण,

भरून आलं की कोसळण, इतकंच तुला जमत.

आमच्या सारख तुला नाही जमणार,अश्रूंना थोपवून धरण.

 सवयी चे झाले आहे आता तुझं आणि त्याच बिन भरवशाच येणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract