STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Others

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Others

मी पाऊस तिचा

मी पाऊस तिचा

1 min
133

तुला नजरेंत साठवून घ्यावं

अलगद मग मनात खोलवर उतरवाव

तुझ्या थेंबात मी तिलाच पहावं

गंध तिचा ,श्वासात भरून ठेवावं

तू आलास की ती ही बघ मोहरते

चिंब चिंब ती भिजलेली,माझ्यात उब शोधते

येतो आहेस तू तर,हळूवार बरसत ये

तुझ्या सोबत सखीला माझ्या बहरु दे

सरी नी तुझ्या दोघांना भिजवाव

मिठीत माझ्या तिने मग अलगद शिरावं

मी पाऊस बनून तिचा,

तिला चिंब चिंब भिजवावं

उमटावी मग कागदावर कविता

शब्दा शब्दात सखे तुझंच रूप दिसावं


समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract