STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Others

3  

Author Sangieta Devkar

Abstract Others

रंग

रंग

1 min
215

बऱ्याचदा अस होत,

काहीच नाही सुचत

शब्दांचे हवे ते रंग

कवितेत माझ्या नाही उतरत

पण साथ सोडत नाही मी,

कधी माझ्या शब्दांची

शब्द असतात माझे कधी,

आभाळ भरून निळा,

तर प्रेमात बुडालेला गुलाबी

सृजनाचा रंग हिरवा,

तर कधी सूर्यास्त केशरी

कधी दुःखाचा काळा,

कधी घननिळा जांभळा

रंगात रंगून मग कविता माझी,

सजते, धजते न्हावून निघते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract