STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

लज्जा

लज्जा

1 min
205

लज्जा,स्त्रीचा दागिना असतो म्हणे.

सांगा मग तिच्या आयुष्यात का बरे ती नसते?

लाचार परिस्थिती अन फाटलेले आयुष्य,

जोडण्या साठी आयुष्याचे वस्त्र,

का बरे होते ती वेळोवेळी विवस्त्र,

तिला नसते का लाज ,लज्जा..शरम.

पोट भरायचे तर विकते ती स्त्री धर्म.

भर रस्त्यात तिला केले जाते बेशरम.

कोणीतरी येतो का झाकायला,

लाज तिची बनून श्री कृष्ण?

नाजूक,सुंदर शब्द असे हा लज्जा.

सगळ्यांसाठीच नाही हो,सुंदर साज हा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract