STORYMIRROR

Radhika Chougule

Abstract Others

4  

Radhika Chougule

Abstract Others

देवचाफा

देवचाफा

1 min
3.8K


तेजाचा पिवळा

नभात मावेना

तप्त धग कुणी

झेलाया धजेना


उतरला थेट

चाफ्याच्या देठात

चाफ्यानेही त्याला

घेतले कुशीत


उजळून गेला

त्याचा अंतरंग

आणि दरवळे

उरात सुगंध


चैतन्याची भेट

कैवल्याशी होता

असामान्य रूपा

येई देवचाफा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract