हिरवा श्रावण
हिरवा श्रावण
1 min
27.4K
आतुर मनात
हिरवे क्षण
हलकेच गुंफतो
हिरवा श्रावण
फिकट मनाचं
हिरवेपण
गडद करतो
हिरवा श्रावण
सूर्यकिरणांत सरींना
गुंफायचा पण
करु जाणे फक्त
हिरवा श्रावण
मनाच्या ऋतुंचे
आगळे सण
साजरे करतो
हिरवा श्रावण
मनात रुजवून
हिरवी आठवण
झरकन सरला
हिरवा श्रावण
