STORYMIRROR

Radhika Chougule

Drama Fantasy Romance

3  

Radhika Chougule

Drama Fantasy Romance

पाऊस ... गुंतलेला

पाऊस ... गुंतलेला

1 min
14.3K


नेहेमीप्रमाणे आलास ,

पण नेहेमीसारखा नव्हतास.

यावेळी नेहेमीपेक्षा

जरा जास्तच रेंगाळलास...

खरं सांग, यंदा तूच माझ्यात जास्त गुंतलास.


माझ्यावर सरी उधळताना

तूच जास्त मोहोरलास.

मला भिजवताना तू का

ओलाचिंब झालास?

खरं सांग, यंदा तूच माझ्यात जास्त गुंतलास.


आषाढ उतू जाता

मधेच दडी मारुन बसलास.

की ढगाआडून लपून

माझी तगमग मोजत राहिलास...

खरं सांग, यंदा तूच माझ्यात जास्त गुंतलास.


भाद्रपदाच्या उन्हात वेड्या

आषाढासारखा कोसळलास.

नक्की कसल्या जाळात

तू एवढा होरपळलास !!

खरं सांग, यंदा तूच माझ्यात जास्त गुंतलास.


हसत दिला निरोप

तर माझ्यावर तू रुसलास.

कहर करून गाव माझा

पाण्याखाली लोटलास...

कबूल कर, यंदा तूच माझ्यात जास्त गुंतलास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama