STORYMIRROR

Atreya Dande

Others

4  

Atreya Dande

Others

देवाची आई

देवाची आई

1 min
1.1K

देवाची आई एकदा गेली लपून

म्हणून देवाने तिला घेतले ओंजळीत जपून

देव म्हणाला, नेहमीसाठी माझ्या जवळच रहायचंय तुला

आई म्हणाली, देवा जायचय रे मला ....


देव ढसा ढसा रडला

माझ्याजवळ कोण मग? असा कुरबुरला 

तशी आई म्हणाली,

अरे एका आईच्या पोटी जन्मायचय मला


देव पण अडून राहिला

म्हणाला, मग तुझ स्मित होऊन यायचय मला

तू खुदकन हसली की तुझ जग पहायचय मला


आई जशी अवतरली, तसा देव सुद्धा खुलला

वेळ सुद्धा थांबला, ह्या क्षणात सामील व्हायला

म्हणूनच काय की लेकीच्या हसूत दिसतो देव आपल्याला!


Rate this content
Log in