चित्त-चिंतन-चैतन्य मराठी
चित्त-चिंतन-चैतन्य मराठी
तांहुल्या बडबडीत
अबोल हुंदक्यात
भिजल्या मनात
आर्त हाक मराठी
नामाच्या नादात
टाळ मृदुंगात
समर्थ मनात
हृदय ताल मराठी
शिवाई गर्जात
सिंह गर्जनात
गड किल्ल्यात
अस्सल आवाज मराठी
विखुरल्या स्वप्नात
धगधगत्या निखार्यात
अखंड विश्वासात
कणखर पाऊल मराठी
कोरड्या भेगात
नांगर चालविण्यात
ताठ कण्यात
उर्जासत्व मराठी
इवल्याशा जीवात
शिकवणीच्या शाळांत
रेखाटलेल्या स्वप्नात
नवचैतन्य मराठी