STORYMIRROR

Atreya Dande

Drama Others

3  

Atreya Dande

Drama Others

विश्वाची या काव्य मंदिरा

विश्वाची या काव्य मंदिरा

1 min
1.1K

विश्वाची या काव्य मंदिरा

वसे मन भगवंता

ओवळीता तुज शब्दार्ती

कवितेचा प्रसाद दिला


भावनेच्या ह्या फूल माळी

सजवण्या रूप तुझे

नव ओव्यांचे गंध कपाळी

काव्याचे हे वस्त्र सजे


विश्वाची या काव्य मंदिरा

वसे मन भगवंता...


असे काकड आरती

असे भूपाळी

पारायण असे

असे मग शेज आरती


हे सद्गुरू चैतन्य तुझे

लोचनी साक्षात ब्रम्ह दिसे

घडीता दर्शन तुझे

हरवते चित्त माझे


विश्वाची या काव्य मंदिरा

वसे मन भगवंता...


कर माझे जोडोनी

तुझ्या कृपा चरणी

सदैवच अर्पितो 

प्रांजळ माझी पुष्पांजली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama