अधुरी स्वप्ने..
अधुरी स्वप्ने..
पाहिलेली सारी स्वप्ने
अधुरीच राहून गेली,
डोळ्यांच्या पापण्यातून
अश्रूसंगे वाहून गेली.
दु:खाचे खोल घाव ती
काळजावर घालून गेली,
मनातील दृढ निश्चयाला
तडा ती देवून गेली.
काळजाच्या त्या जखमेवर
फुंकर ती घालून गेली,
व्यर्थ अशा जीवनाची
चाहूल ती देवून गेली.
निष्पाप अशा या देहाची
तळमळ ती करवून गेली.
मनाच्या इवल्याशा पिंज-यात
तशीच ती अडकून पडली.
स्वत:चे दु:ख गिळूनी
सा-यांना हसवत गेली
पाहिलेली सारी स्वप्ने
अधुरीच राहून गेली..
