Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prajakta Waghmare

Abstract

4  

Prajakta Waghmare

Abstract

नाही

नाही

1 min
429


खूप काही असत नाही या शब्दात

पण सर्वानाच ते कळत नाही

अबोल शब्दांचा भाव काय आहे

तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही

शांततेत खूप मोठं वादळ असत

हे कधी कोणाला जाणवतच नाही

गर्दीतही कोणीतरी पाखरू 

एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही

बाहेरून आनंदी असणारी व्यक्ती आतून किती

कोलमडली आहे हे कधी कळतच नाही

जे नको असत ते न मागता ही मिळत

पण मनापासून जे हवं असत ते सहजासहजी कधी मिळत नाही

जे आपल्या परिचयाचे असतात खर तर ते

कधीही आपल्याला खऱ्या अर्थाने ओळ्खतच नाही

छोटंसं असणार मन आणि छोटीशी त्याची स्वप्नं

सर्वानाच जपता येत नाही

सर्वानाच जपता येत नाही....


Rate this content
Log in