आई
आई


नाही आमच्याकडे खूप पैसा
पण माणुसकी आहे मनात
विश्वास आहे आमचंही आयुष्य
बदलून जाईल क्षणात
माझी आई आहे
जी कधी नाही हारत
कितीही दुःख असलं तरी हसते
माझ्यासाठी नाही ती रडत
काटेकुटे टोचतात तिला
तरी ती राहते चालत
सारं काही माझ्यासाठी करते
स्वतःसाठी काही नाही मागत
माझं आई म्हणणंच
तिला असतं सुखावत
त्या शब्दांमुळे असते
सारं दुःख लपवत...