पालवी
पालवी


पालवी पालवी झाडाची डुलते
जणू मला स्वतःकडे खुणवते
कोवळे कोवळे तिचे रूप मोहवते
हास्याची रेषा गाली माझ्या उमटवते
डुलत डुलत ती गुजगोष्टी करते
आयुष्य कसे जगावे हेच सांगते
कितीदा कितीदा पालवी गळून जाते
तरी ना कधी ती सहज हार मानते
पुन्हा जोमाने जोमाने बहरून येते
आयुष्य जगण्याचे गमक ती सांगते