STORYMIRROR

Prajakta Waghmare

Others

1.0  

Prajakta Waghmare

Others

स्त्री म्हणून जगताना

स्त्री म्हणून जगताना

1 min
636

स्त्री म्हणून जगताना

मला खूप काही नको

थोडं प्रेम आणि आपुलकी पाहिजे

जीवनाच्या कठीण प्रसंगात 

विश्वासाची जोड पाहिजे


स्त्री म्हणून जगताना

अपमानाची किनार नको

गोड कौतुकाचे दोन शब्द पाहिजे

आणि पाठीवर फक्त

पाठिंब्याचा हाथ पाहिजे


स्त्री म्हणून जगताना

अविश्वासाचा सामना नको

स्वतःला सिद्ध करण्याची संधी पाहिजे

त्यासाठी आपल्या माणसांची

शेवटपर्यंत साथ पाहिजे


स्त्री म्हणून जगताना

एक दिवसाचा खोटा सन्मान नको

बोचऱ्या रात्री पण स्त्रीत्वाचा आदर पाहिजे

उंच मानेने वावरण्यासाठी

पुरुषी खांद्याचा फक आणि फक्त पाठिंबा पाहिजे

    फक्त पाठिंबा पाहिजे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन