प्रेम
प्रेम
1 min
111
नुसतं नाव जरी ऐकलं
तरी मनाला वेगळंच भासतं
अनुभव घ्यावा याचा
अस प्रत्येकाला वाटतं
एकमेकांच्या हळूहळू जवळ जाता
कळू लागतात अबोल भावना
एकमेकांची साथ देऊन जगावे
अशी जागते प्रत्येकाच्या मनात कामना
मधुर अश्या आठवणीत मग्न होऊन
दिवसाही रात्र जाणवते
भानावर येता चित्त
स्वप्न पाहतोय हे कळते
अनामिक असे प्रेम हे
काहींचे पूर्ण होते काहींचे अपूर्ण राहते
पण कडू गोड आठवणी सोबत ठेवून
हृदयाच्या स्पंदनात हे कायमसाठी वसते...
