आईपण
आईपण
1 min
367
सारं दुःख माझं मी विसरते
तुझा निरागस चेहरा पाहून
आईपण अनुभवते मी
तुला उराशी कवटाळून
तू माझं अस्तित्व आहेस
जे मला जगवतं
कितीही वेदना असो
तुझं निरागसपण मला हसवतं
नको वाटतं कधी कधी सारं
तरी मी आहे जगते
बाळा तुझ्यामध्येच
सारं सुख मी आहे बघते
तू माझी आहेस शक्ती
जी मला ना हरु देते
तुझ्या भविष्यासाठीच ही आई
दिनरात्र बघ कष्ट घेते...
