तुझी निरागसता
तुझी निरागसता
1 min
491
तुझ्या रुपात मला
सुख भेटायला आले
निरागसतेने तुझ्या
माझे दुःख दूर नेले
तुझे असणे
मला नवी प्रेरणा देते
अद्भुत दडलेली माझ्यातील शक्ती
माझ्यातूनच बाहेर आणते
तू आहेस म्हणून
या जगण्याला आहे अर्थ
तुझ्याशिवाय तर या आईचा
प्रत्येक क्षण आहे व्यर्थ
तुझी निरागसता म्हणजे
उनाड माळरानावर फुललेलं फुलं
प्रत्येक आईला नवीन जीवन देते
तिचं हसतमुख राहणार तीच मुलं..
