STORYMIRROR

Prajakta Waghmare

Others

3  

Prajakta Waghmare

Others

तुझ्या सुखासाठी

तुझ्या सुखासाठी

1 min
159

माझी छाया सदैव

तुझ्यावर असेल

मी असताना तुला

काहीच कमी नसेल

कितीही खडतर प्रसंग असो

तुझ्यावर असेल माझी साऊली

तुझ्या सुखासाठी कायम

झिजेल तुझी ही माऊली

तुझं हास्य मी सदा

असच तेवत ठेवेन

जेव्हा जेव्हा प्रार्थना करेन

देवाला तुझ्यासाठीच काहीतरी मागेन

कोणतीच चिंता तुझ्याजवळ

येऊ नाही देणार

तुझ्या आनंदाचा सारा

वेडा ध्यास मी घेणार



साहित्याला गुण द्या
लॉग इन