STORYMIRROR

Prajakta Waghmare

Others

3  

Prajakta Waghmare

Others

माझी नारीशक्ती (अष्टाक्षरी)

माझी नारीशक्ती (अष्टाक्षरी)

1 min
296

एक दिवसाचा नको

खोटा हा स्त्रीचा जागर

दूर करा अविश्वास

खाली करा ती घागर


मुक्त होऊ देत मला

घेऊ द्या उंच भरारी

बळ द्या फक्त येईल

माझ्या पंखाना उभारी


दुःख सहन करणे

विसरली आहे सारे

माझ्या प्रगतीने आता

वाहे यशाचे हे वारे


नाही राहिली हो आता

पूर्वीसम मी अबला

खूप सशक्त बनली

झाली आहे मी सबला


अंधकार दूर करी

सदा हीच नारीशक्ती

देऊ कुविचारास हो

सदासाठी आता मुक्ती



Rate this content
Log in