दिवस तेच छान होते...
दिवस तेच छान होते...
1 min
330
दिवस तेच छान होते
जे बालपणीचे होते
कसलीच चिंता नव्हती ना
कसलीच काळजी नव्हती
सर्वांचा मोलाचा आशीर्वाद
कायम पाठीशी असायचा
छोट्या छोट्या गोष्टीत ही
मोठा मोठा आनंद मिळायचा
हवं तिथे बागडता यायचं
मनाला वाटेल ते कधीही
स्वतःहून करायला जमायचं
मन कशातही रमून जायचं
खरंच दिवस तेच छान होते
जे बालपणीचे होते
स्वतःसाठी स्वतःच
आनंदाने जगण्याचे होते....
