STORYMIRROR

Prajakta Waghmare

Others

4  

Prajakta Waghmare

Others

स्वतःमधल्या स्वतःलाच जिंकायचं

स्वतःमधल्या स्वतःलाच जिंकायचं

1 min
398

सर्वासारखं जगायचं नाही मला

सर्वांपेक्षा थोडं वेगळं जगायच आहे मला

यशाची उंच भरारी घ्यायला

स्वतःमधल्या स्वतःलाच जिंकायचं आहे मला


दुःख सर्वांनाच असतात

पण मला त्या दुःखाना कवटाळून बसायचं नाही

त्या दुःखावर मात करत लढायचं आहे

कारण स्वतःमधल्याच स्वतःल जिंकायचं आहे मला


राग मलाही येतो खूपदा

म्हणून मला द्वेषाला खतपाणी द्यायच नाही

एक चांगली व्यक्ती बनायचं आहे

कारण स्वतःमधल्या स्वतःलाच जिंकायचं आहे मला


इतरांच्या आयुष्यासारखीच माझ्या आयुष्यात ही वळणे येतात

पण मला त्या वळणांवर थांबायचं मात्र नाही

योग्य गती घेऊन पुढे चालायचं आहे

कारण स्वतःमधल्या स्वतःलाच जिंकायच आहे मला...


Rate this content
Log in