राजे परत आलात तर
राजे परत आलात तर
राजे तुम्ही परत आलात
तर होईल बघा बरं
सगळीकडं वाहिलं बघा
आनंदी आनंद वारं ।।धृ।।
बारभाई गोळा करून
तुम्ही निर्मिली समता
सगळ्यांचे वेगळे झेंडे
समाजात दिसतेय विषमता ।।१।।
नामोहरम करण्या शत्रूला
वापरला सदा गनिमीकावा
जाहीराती चा भडीमार आता
सगळा नकली फक्त देखावा ।।२।।
परस्त्री मानली माता
अब्रूवर पडू न दिले हात
बेअब्रू करण्य
ा सारसावलेत
आता कित्तेक जणांचे हात ।।३।।
हिंदवी स्वराज्य निर्माणा
तुमची तळपली तलवार
क्षुल्लक करणा इथे
चौकात होतात वार ।।४।।
दिनरात घाम गाळून
मरत्यात कुणब्याची पोरं
उठवला आवाज तर
म्हणतात आलाय का तुला जोर ।।५।।
आजही हर-हर महादेव
घोषणा पडतेय कानी
तुम्हा शोधण्या फिरताहेत
पाय कडेकपारीतुनी ।।६।।