STORYMIRROR

Khushal Gulhane

Inspirational

4  

Khushal Gulhane

Inspirational

आत्महत्या

आत्महत्या

1 min
41.3K



कायले रे शेतकर्‍या तू आत्महत्या करतं

मर्दाची जात तुही, अन् जिंदगीले डरतं !


तुह्याच होये पैसा थो, जे घेतलं तुनं कर्ज

मारल्या होत्या चकरा, तरी करासाठी अर्ज


फेडासाठी बायकोसंगं राबराब राबला

बुढा झाला बाप तरी डवरा-दुंडा दाबला


तरी नाही फिटलं कर्ज,ह्या दोस नोहे तुह्या

आतातरी उघड डोये,अन् खोस बरं बाह्या


मांगतल्यानं भेटत नाही,नियम ह्या जुना

हिसके मारल्याबिना गाय सोडते का पाना ?


तपू देरे रगत ,ऊठ आतातरी पेटून

ये असा रस्त्यावर, बस चांगला रेटून


बांध बरं मुठा ,अन् सांग सार्‍यायीले यंदा

शेती दुसरं काही नाही, हाये उद्दोगधंदा !


सोडून दे राजकारन, अन् थ्याहीचा नाद

आपापसातले भुलून जा जुने-नवे वाद


शत्रूअन् मित्राची कर खरी पारख

कोनता होये बिबा अन् कोनती होये खारक


एवढं जर केलंत सारे तुह्याजवयं येतीन

बिसलरी सोडून माठातलं पानी पेतीन


शेतीपरधान देशी जर शेतकरीच मरन

तर मंग सांग कसा देस आपला तरन?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational