नारी
नारी
1 min
14K
प्रेम,दया,माया,स्नेह
सदा वसे जिच्याठायी,
रूप साक्षात देवीचे
असो कोणतीही बाई.
मायबाप बहीणभाऊ
जाई सोडून घरटं,
सासू,सासरा,नणंद
मानी सार्यांना आप्तेष्ट.
चिल्यापिल्यांची ती छाया
नवर्याची होई माय,
घरी आलेला अतिथी
कधी भुकेला न जाय.
दिले निसर्गाने जिला
निर्मितीचे वरदान,
तिचा जगती सर्वत्र
व्हावा सदैव सन्मान.
देई दुजाला सुवास
नारी पवित्र चंदन,
सुखी होवो जिणे तिचे
हेच ह्रदयी स्पंदन !