STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Drama

3  

Kamlesh Sonkusale

Drama

आस जगण्याची

आस जगण्याची

1 min
27.9K


पावला पावलांनी हे

वय निघून जात आहे,

रंगहीन स्वप्न अजूनही

जिथल्या तिथेच आहे.


जगण्यातील एकांतवास

काही केल्या सरत नाही,

आठवणींचा डोंगर अजूनही

जिथल्या तिथेच आहे.


का कळू नये तिलाही

भविष्यातील मधुर स्वप्ने

कोरे मनःपटल अजूनही

जिथल्या तिथेच आहे.


श्वासाचा बुडबुडा हा

किती काळ टिकेल ?

हवेचा झोका अजूनही

जिथल्या तिथेच आहे.


डोईवरचे ओझे उतारण्या

चढेल चौघांच्या खांद्यावरी,

कर्तव्याचा बाणा अजूनही

जिथल्या तिथेच आहे.


सरणावरती चंदनाची

लाकडे सजली तरी,

जगण्याची आस अजूनही

जिथल्या तिथेच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama