STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Others

3  

Kamlesh Sonkusale

Others

आई

आई

1 min
14.6K



नको झगमगते कपडे

अन जेवणाची आरास,

मला तर फक्त हवा

आनंदाचा क्षण तो खास.


दिवाळीचा झगमगाट नको

भेटावा फक्त अनमोल क्षण,

आईच्या हातची भाकरी पुन्हा

क्षणोक्षणी आनंदाची उधळण.


ती असली मज जवळी

वाटे प्रत्येक क्षण दिवाळी,

ती जवळ नसतांना मात्र

नेहमीच माझी रिकामी झोळी.


तिच्या हाकेनी सदासर्वदा

हृदयात पणती तेवते,

ती असली जवळ की

काळोखी रात्रही दिवाळी ठरते.



Rate this content
Log in