STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Romance Tragedy

3  

Kamlesh Sonkusale

Romance Tragedy

सुगंधीत जखमा

सुगंधीत जखमा

1 min
5.1K


साथ मिळता मजला

निरपेक्ष त्या प्रेमाची

जीवनात धुंद नशा

तू येण्याच्या प्रतिक्षेची


येता अशी जीवनात

लागे चाहूल सुखाची

मज नसे चिंता मग

ओथंबत्या आसवांची


आघात होता हृदयी

काहुर तन-मनाची

का स्मरावे मी नव्याने

स्वप्ने आता प्रणयाची


विरहाशी जुळे गट्टी

कासावीस त्या मनाची

साक्ष काढू कशी आता

सुगंधीत जखमांची


आर्त हाक वेदनेला

हुरहूरत्या तनाची

मज वाटे फुंकर ती

धगधगत्या क्षणाची



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance