लढा
लढा
1 min
201
मी कुठलेच आता, गीत गात नाही
शब्दांना हवी ती, उरली बात नाही
करतोय वार,नकळत कोरोना
औषध तयाचे, या जगात नाही
विलग राहून, चैन तोडू त्याची
वार करण्यास, त्याला हात नाही
होऊ आता सज्ज, दोन हात करण्या
कोरोनावर अजून, केली मात नाही
मशाल घेता लढू, कोरोनाचा लढा
उजेड देण्या आता, उरली वात नाही
सुरू मदत खरी, माणुसकीच्या नात्याने
ना धर्म ओळखीचा, ना कुठली जात नाही
डॉक्टर पोलीस, धजताय यंत्रणा
दिन कुठे सुखाचा, उरली रात नाही
तोडण्या साखळी, पाळू या एकांत
गर्दीत माणसाच्या, माणूस जात नाही
