STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Children

4  

Kamlesh Sonkusale

Children

चंद्रावर स्वारी

चंद्रावर स्वारी

1 min
698

जाऊ आपण चंद्रावर

घेऊ उंचच उंच भरारी

रात्री असेल खूप अंधार

जाऊया भर दुपारी


थकल्यावर आपण

करायची का न्याहारी

घेतली आहे सोबत मी

चटणी अन भाकरी


तहान लागल्यावर पिऊ

ढगामधलंच पाणी

पाण्याचा प्रश्न नक्कीच

विचारणार नाही कुणी


नको आकाशात फजिती

घेऊ या इंधन फारसे

किती दिवस मुक्काम तरी

संपण्याची चिंता नसे


थकल्यावर झोप घेताना

आई गायची तुझी गाणी

चंदामामा लपु नकोस

गोड वाटे रे तुझी गाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children