STORYMIRROR

Kothekar yogita Sanjay Kothekar

Children Stories

4  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Children Stories

पुस्तक मैत्री

पुस्तक मैत्री

1 min
883



या बाळानों या रे या ,

पुस्तके आपण वाचू या॥ धृ ॥


वाचन करिता मिळे स्फूर्ती

पसरेल मग दूरवर कीर्ती

वाचू या , गोष्टी, कथा

शौर्याच्या , वीरांच्या 

तर मग कामे टाकुनिया ,

पाहू चला पुस्तकांची दुनिया ॥१॥


खजिना जगाचा यात दिसे

ज्ञान , विज्ञान मनी ठसे

वेड लागावे वाचण्याचे

पुस्तकी चित्रे पहाण्याचे

तर मग या मैत्री करूया

पुस्तकाना जपू या ॥२॥


वाचन करेल जो छान

वाढेल जगी त्याचा मान

शब्दांचा पसारा किती

हाती येती शब्द मोती

चला मग पुस्तकांच्या गावी जावू

वाचनाची ओढ लावून घेवू ॥३॥




Rate this content
Log in