Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kothekar yogita Sanjay Kothekar

Inspirational

4  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Inspirational

भीमा तू शिल्पकार घटनेचा

भीमा तू शिल्पकार घटनेचा

1 min
414



संविधानाच्या शिल्पकारा ,

दलितांचा जादूगार तू

कैवारी तू भाग्यविधाता

वंचिताचा देवदूत तू ॥


करण्या उद्धार अस्पृश्यांचा

अवतरले हात हे तेजोमय

झटला अविरत ,संघर्ष केला

अनाथांची बनला माय तू ॥


हे कतृत्व , तुझे श्रेष्ठत्व,

आजन्म तू श्रमलास

तुझिया हस्त स्पर्श झाले

पाणी चवदार,केलेस तू ॥


शिक्षणाचा महिमा सांगण्या

झाला प्रेमाचा सागर

काढलेस तू वृत्तपत्रे

निरक्षरां केले साक्षर तू ॥


भीमा ,तू शिल्पकार घटनेचा

उपदेश दिला जनतेला

संघटित व्हा, शिकून सारे

प्रगतीस्तव संघर्ष करा ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational