STORYMIRROR

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

3  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

प्रपोज - एक नवा दृष्टीकोन

प्रपोज - एक नवा दृष्टीकोन

1 min
332

प्रपोज शिकविन मी

कराया, पुज्य आईवडिलांना

बनूनी खंबीर आधारस्तंभ

पाडा साऱ्या वृद्धाश्रमाना


प्रपोज शिकविन मी

कराया, प्रेमळ या नात्यांना

विश्वासाने जपू या सारे

गुंफलेल्या नाजूक धाग्यांना


प्रपोज शिकविन मी

कराया , मानवतेला

नष्ट करूनी अनेक

समाजातील विकृतीला


प्रपोज शिकविन मी

कराया , स्त्रिरक्षणाचा

मान सन्मान ठेवू चला

सदा हर एक नारीचा


प्रपोज शिकविन मी

कराया , नेहमी समानतेचा

जातीभेद दूर सारूनी

स्विकार करु एकात्मतेचा


प्रपोज शिकविन मी

कराया , ज्ञान विज्ञानाचा

अंधश्रद्धा गाडुनिया

कास धरा, तंत्रज्ञानचा


प्रपोज शिकविन मी

कराया , संस्कारांचा

चांगले विचार ' स्विकारून

मान वाढवू संस्कृतीचा

.

असे प्रपोज करता येई

आंनदाला उधाण मनी

होवू दया सुरुवात नव्याने

करूया सुविचारांची पेरणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन