STORYMIRROR

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

3  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

संयम

संयम

1 min
1.0K



संयम असे युद्ध

स्वतःचे स्वतःशी

हीच आहे जीवनातली

अवघड परीक्षा जशी ॥


मिळवायचे असेल साध्य

तर धरा संयमाची कास

वेळ जरी लागता थोडा

यश मिळेल ,पण हमखास ॥


संधी मिळेल योग्य

वाट नका पाहू

संयमाने कार्य करीत

सदा प्रयत्नात राहू ॥


दूःखाचे दिवस जातीत

येतील दिवस सुखाचे

संयम मनी ठेवाल

धम मिळेल कायमचे


जे तुम्हाला टाळतील

तेच पाहतील वाट

जे तुम्हाला हसतील

तेच ठेवतील थाट॥


रागाच्या प्रत्येक क्षणी

नका वाहत जाऊ

पश्चात्तापाची वेळ वाचेल

सदा संयम ठेवू ॥



Rate this content
Log in