निंदक
निंदक
असावे शेजारी
निंदकाचे घर म्हणे
नित्य सुधारणे
त्यामुळेची
निंदकांना माना
आपला मित्र खरा
नकोची तोरा
यशाचा
निंदक दाखवी
प्रगतीचा योग
्य मार्ग
धरी सन्मार्ग
आयुष्यात
विकासाची सुत्रे
हमखास येती हाती
जेव्हा ऐकती
दोषारोप
असे दोष
दूर करुनिया सारे
समृद्धीची द्वारे
उघडतील