STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

ती एक सावित्री

ती एक सावित्री

1 min
271

ती एक होती सावित्री 

पतीचे प्राण वाचवणारी

ही एक आहे सावित्री 

स्त्रियांचे जीवन वाचवणारी

 शिक्षण रुपाने स्त्रीला

 मिळाले जीवदान 

देती आता तिला महत्व

 करती तिचा सन्मान

शिक्षणामुळे स्त्री

 स्वयंसिद्धा झाली

सर्वांना तिच्यातल्या

 माणूसपणाची जाणीव झाली

त्या सावित्री वर झाला

 शेण मातीचा मारा तरीही

तिने सोडले नाही

 आपले व्रत असिधारा

या सत्कार्यासाठी दिला

 भिडे यांनी आपला वाडा

 जरी इतरे जनांनी

 घातला होता त्यात खोडा

आपला संकल्प  

नेला तिने तडीला

शिक्षणाची द्वारे केली खुली पुढच्या पिढीला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational