STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

जनतेची कैफियत

जनतेची कैफियत

1 min
130

काका असो वा पुतण्या

 आम्हाला काही फरक नाही

 आमची रोज मरा जिंदगी

 त्यात काही फरक नाही


बोकाळलेला भ्रष्टाचार

 टेबलाखालून द्यायच्या नोटा

 कष्टाच्या कमाईला

 फुटल्यात अनेक वाटा


खड्ड्यात रस्ते

 का रस्त्यात खड्डे 

कळतच नाही आम्हाला

 जीव मुठीत धरून

 जातो आम्ही कामाला


धो धो पाऊस, उघडे मॅन होल

उघडी गटारे, नाले तुंबलेले 

 मरणाची जिवघेणी ट्राफिक 

 आमचे जीवन त्यात थांबलेले


शेतकरी कष्टकरी 

यांची हालत सुधारणार नाही 

राव चढले पंत पडले

 काही फरक पडणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy