STORYMIRROR

Prashant Kadam

Comedy

4  

Prashant Kadam

Comedy

ट्रायल

ट्रायल

1 min
364

ट्रायल रुमच्या दरवाजाबाहेर 

बिचारा नवरा होता ताटकळत

खांद्यावर लाईफस्टाईलची बॅग

अन् मोबाईलवर होता खेळत 


आजुबाजूला बायकांचा गराडा

हा संकोचाने उभा होता बिचारा

मधे मोबाईलमधून मान काढत

गप बघत होता बाहेरचा नजारा


मधेच दरवाजात यायची ललना

शू शू करत नवऱ्याला शोधायची

अंगावर चढवलेला नवीन ड्रेस

मुरडत येवून दाखवून जायची 


वा किती छान, हा सैल, हा तंग

अशा अनेक कमेंट होता ऐकत

मोबाईलमध्ये खेळता खेळता

चोरुन बघत होता सगळी गम्मत


तेवढ्यात बायको आली दारावर

चढवून एक भन्नाट ड्रेस अंगावर

शू शू, अहो बघा तरी कशी दिसते

दोन शब्दांत नवरा आला भानावर


तिला बघुन त्याचे डोळे विस्फारले

नको, छी, छी त्याने मानेने दर्शवले

अहो असे काय करता नीट बघा तरी

तिने रागात त्याला जोरात फटकारले


त्यानंतरचा तिचा तो तिखट कटाक्ष 

बघताच त्याने हसू आणले गालावर

मस्त खूपच छान दिसतोय तूझ्यावर

म्हणत लक्ष केंद्रित केले मोबाईलवर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy