खट्याळ सासू नाठाळ सून
खट्याळ सासू नाठाळ सून


जोडी अशी सासू सूनेची
मग काय रोजच गंमत
कोण कोणास बोलणार
ऐकायला येईल जंमत
खट्याळ सासू बोले
करु आज पालेभाजी
सून नक्कीच वदणार
चालवा सदा तुमची मर्जी
खट्याळ सासू करी पूजा
तेव्हाच लावी टीवी जोरात
नाठाळपणा तिचा ती दावी
त्रास देई सासुच्या स्तवनात
नाठाळ सूनेने केला लादी पोछा
म्हणे कसे स्वच्छ पहा घर
काढावी का अडगळ आताच?
सासू सहजतेने वदे त्यावर.
मते जुळणे होई कठीण
वाद विवादांची सदा रंगत
अशी असता दोघींची जोडी
तरी जमते छान संगत