भोंडल्याचे आधुनिक गाणे
भोंडल्याचे आधुनिक गाणे


घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....|| धृ ||
सुनबाई तुला गं,कशाला भोंडला
झुंबा जिममध्ये गं तुझा जीव कोंडला
गं तुझा जीव कोंडला ......
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....
तुला कशाला हवं,झिम पोरी झिम
फोनमध्ये तुझ्या गं,दोन चार सिम
गं बाई दोन चार सिम .....
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....|| धृ ||
फुगडी भुलाबाईचा ,सासूनं खेळ मांडला
नको बाई ऑनलाईन ,माझा जीव रंगला
बाई माझा जीव रंगला
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....|| धृ ||
अगं अगं सुने तुला ,येते का चकली ?
काळजी नको सासूबाई ,मी विकत आणली
बाई विकत आणली .....
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....
अगो अगो सुनबाई ,कुठे गेली टिकली ?
काय सांगू सासूबाई ,आता सारं नकली
बाई आता सारं नकली
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....
अगं अगं सुनबाई ,खोबरं जरा खिस
कुठे आहेत सासूबाई ,गेले ते दिस
आता गेले ते दिस ...
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....
पुढे गेला काळ,आता काय करू देवा ?
साऱ्या सयांना सांगून ,जपेन मी ठेवा
बाई जपेन मी ठेवा ....
घे बाई घे व्हाट्सअप घे
घे बाई घे फेसबुक घे
माणूस म्हणून आता जगून घे
बाई जगून घे .....