आठवणीतील भेट
आठवणीतील भेट
1 min
438
नेहमीच आतून वाटतं
जाऊन यावं पुन्हा शाळेत
व्हावे बालपणीचे मोती
त्याच तुटलेल्या माळेत
प्रवासातच दाटून आला
आठवांचा गोड जिव्हाळा
विझलेल्या निखाऱ्यातही
होता अतृप्त उमाळा
मागे जाऊ लागला
झरझर काळाचा पट
चार पाऊले चालणे
वाटू लागला तट
गळून पडली सारी
मोठेपणाची फोलपटं
भरून आलेल्या जखमांची
पुन्हा निघाली सालपटं
कोरली होती शाळा
माझ्या हृदयात थेट
कशी विसरेल मी
ही अविस्मरणीय भेट
