धर्म आणि प्रेम
धर्म आणि प्रेम
सगळे म्हणतात धर्माने चालायचं...
मग प्रेम धर्म नाही..?
प्रेम सत्य नाही..?
धर्मात ही वचनबद्घता असते
तशी प्रेमात ही असतेच की....
समाज एकाला मान्यता देतो नि एकाला नाही...?
असं का?
प्रेम म्हणजे ही सत्य
आणि धर्म म्हणजे ही सत्य..
पण धर्म मोठा आणि तो शिरोधार्य...
पण प्रेम म्हणजे लफडं
धर्म म्हणजे समाजाचा फुगवटा
आणि प्रेम म्हणजे सुकडं...?
पण लक्षात असू द्या...
धर्म तुम्ही आम्ही बनवला
प्रेम तर हृदयातून फुललेली कला....
धर्म बंधन आहे
तर प्रेम मुक्तलिला ....
सापडायचा च असेल धर्म
तर शंभर मिळतील जगाच्या पाठीवर
पण प्रेम सगळ्यांचं एकच राहील
तुम्ही आम्ही येथे आहोत जो वर ....
धर्म तर जन्मानंतर येतो
पण प्रेम आत्म्याचा धर्म आहे...
धर्माने फारतर जाणता येईल कर्म
पण प्रेम आहे आयुष्याचं मर्म ...
धर्म आमच्या मनाचा घटक आहे
पण प्रेम खोलवर आत्म्याचा घटक आहे
दुनियेला एकत्र बांधायचे असेल तर
प्रेमाने जगायला शिकवावे...
कारण धर्माने स्वर्गात जाता येईल
पण प्रेमाने भगवंताच्या वर्गात जाता येईल..
धर्म शक्ती आहे
तर प्रेम मुक्ती आहे
धर्म युक्ती आहे
तर प्रेम भक्ती आहे.....
धर्म पौराणिक वाणी आहे
पण प्रेम जीवनाचा अर्थ...पाणी आहे..
