STORYMIRROR

harshada joshi

Others

4  

harshada joshi

Others

संकल्पातून सिद्धी

संकल्पातून सिद्धी

1 min
280

जिंकले होते मी

चालू होते कौतुकाचे सोहळे 

समोर टाळ्यांचा कडकडाट 

सुखाने मुटके गिळत होते दिवा स्वप्नात 

बस्स......! 

ठरवून टाकलं, 

आता जिंकायचचं

संकटांच्या येऊ दे लाटा

वाटांना फुटू दे फाटा

रुतला जरी आता पायात काटा 

नाही....,आता नाही थांबायचं 

कष्टांच्या पायवाटेवरून 

आता मागे नाही फिरायचं ...

आता झिजले तरी चालेल 

पण गंजून नाही जायचं....

असतील जरी आज 

अनुभवांचे रिते गाठोडे 

परि बाळगून जिद्ध उराशी 

आता सिद्ध व्हायचं ....

उचलली मूठभर माती 

संकल्प घेऊन हाती 

आता स्वतःला वाहून घ्यायचं ....

वेळ काळाला मागे टाकून ठरवलं निघायचं ..

संकल्पातून सिद्धीकडे जायचं....

सत्याहून ही सुंदर वाटलं,

संकल्पाचे सामर्थ्य,

नेले तडीस ध्येयाला 

जेव्हा तयात शिकले हरवायला .....


Rate this content
Log in