दैवीसंदेश
दैवीसंदेश
जेव्हा तुझ्या दारी आले
आशीर्वाद घ्यायला
दिली तूच बुद्धी
की आलास अंतरात राहायला ....
अंतराचा अंतराशी
लागला संवाद व्हायला
बुद्धीचे मंथन नव्हते ते
भवसागरातून तारण्यासाठी
भाव संकेत नि लागलास संदेश द्यायला .....
देवा तुझा माझा अंतरातुनि
सहज संवाद जाहला ....
दिस तोचि आत्मसाक्षात्कार ठरला ...
धुतले अश्रूंनी सर्वांग
मनातला कचरा तू लोटला ....
भक्तीचा झरा अंतरात स्रवला ....
होता तुझा दृश्यसंदेश की
दृश्यदृष्टांत मजला देऊ केला ?
त्या क्षणापासून आलास प्रवासात तू
नि प्रवास तीर्थयात्रा होऊ लागला ....
ही पुण्याई कोणत्या जन्माची
तू माझ्यात वावरू लागला .....
आणि संदेश माझे आयुष्य होऊन गेला ......
